Thursday, April 23, 2020

विद्यार्थी - सूचना

विद्यार्थी मित्रहो,
कसे आहात ? घरीच रहा, सुरक्षित रहा .मी जो तुम्हाला अभ्यास देतो आहे तो अभ्यास करताय ना . कोण अभ्यास करते व कोण नाही हे मला कळते आहे. मी पाठविलेला अभ्यास अल्फिया, मोनाली, सचिन, प्रशंसा, साहिल हे  नियमितपणे करत आहेत. त्यांचे अभिनंदन ! मी पाठविलेला अभ्यास ऑनलाईन असल्याने त्याचा उपयोग अन्य शाळेतीलच विद्यार्थी जास्त करत आहेत. खरेतर हा उपक्रम तुमच्यासाठी आहे. काल परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी सोबत पाठवत आहे. तुम्ही आहात का त्यामध्ये शोधा आणि त्यामध्ये नसाल तर अभ्यासाला सुरवात करा. काही अडचण येत असेल तर केव्हाही मला फोन करा.
धन्यवाद!

No comments:

Post a Comment

प्रवेश सुरु! प्रवेश सुरु! प्रवेश सुरु!

प्रवेश सुरु! प्रवेश सुरु! प्रवेश सुरु! दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया संस्थेचे, मिशन गर्ल्स हायस्कूल, श्रीगोंदा, ता. ...